नांदेड : जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमिवर नांदेड येथे जंबो कोविड सेंटर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. हे सेंटर ४ दिवसांत हे सेंटर कार्यरत करण्यात येणार असल्याचे प्रयत्न देखील सुरु आहेत. या सेंटरमध्ये सुमारे २०० खाटा व ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध असणार आहेत. हे सेंटर लवकरच कार्यरत करुन कोरोनाच्या रुग्णांना उपचार देखील केले जाणार आहे.
औरंगाबाद शहरानंतर कोरोनाचे रुग्ण वाढ होत असणारा जिल्हा म्हणुन नांदेडचे नाव समोर आले आहे. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये कोरोना रग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या वर उपाययोजना म्हणुन जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त तसेच विभागीय आयुक्त देखील बैठक घेवून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी लॉकडाऊन, अंशत: लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन देखील लावले होते. परंतू आताही कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आता नवीन तयार होणारे कोविड सेंटर खुप अत्याधुनिक असल्याने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नक्कीच याचा फायदा होणार यामध्ये मात्र शंकाच नाही.
आता नांदेडकरांच्या सेवेमध्ये नवीन जंबो कोविड सेंटरची उभारणी अंतीम टप्प्यात आहे. लवकरच हे सेंटर सेवेमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या रुग्णांवर जलद गतीने उपचार करणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान या रुग्णालयात असणार आहे. त्यामुळे कोणत्याही गरिब तसेच गरजु नागरिकांना आता विनाकारण आर्थिक भूर्दंड बसणार नाही. त्यामुळे हे जंबो कोविड सेंटर हे लवकरात लवकर सेवेत सुरु होणार असल्याने कोविड रुग्णांना मात्र या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. या जंबो कोविड सेंटरसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण हे स्वत: लक्ष लक्ष घालत असून नागरिकांना लवकरात लवकर याचा लाभ मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न देखील करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएलच्या इतिहासात कुणालाही न जमलेली कामगिरी शिखर धवनच्या नावावर
- ‘भाजपा विकृत मानसिकतेचा पक्ष…भाजपाचा महाराष्ट्र द्रोह विसरू नका!’
- ‘बसस्थानकाच्या श्रेयासाठी धनंजय मुंडेंचा आटापिटा’
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- रेमडेसिवीरचे भाजपा कार्यालयात मोफत वाटप केल्यामुळे राष्ट्रवादीचा संताप होण्याचे कारण काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

