Share

कोरोनाचा धोका वाढला : हायकोर्टाने दणका दिल्यानंतर गुजरातच्या २० शहरांत नाईट कर्फ्यू लागू

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : करोना संक्रमणाचा देशभर होणारा फैलाव चिंतेत अधिक भर टाकतोय. आज सकाळी समोर आलेली करोनाची आकडेवारी धोक्याची घंटा ठरतेय. देशात गेल्या २४ तासांत १ लाख १५ हजारांच्या घरात नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, गुजरात राज्यात राज्यात कोव्हिड १९ संक्रमणाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असून देखील कडक पावले न उचलणाऱ्या गुजरात सरकारची न्यायालयाने चांगलीच कानउघडणी केली आहे. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी तीन – चार दिवसांसाठी कर्फ्यू, नाईट कर्फ्यू अन्यथा लॉकडाऊन करण्याबाबत उच्च न्यायालयानं एका याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला सांगितले आहे.

करोना संक्रमणाच्या स्थितीवर स्वत:हून हस्तक्षेप करत मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती भार्गव करिया यांच्या खंडपीठानं एका याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला हा सल्ला दिला होता.यानंतर आता राज्य सरकारकडून २० शहरांत नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आलीय. लग्न समारंभात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची संख्याही सीमित केलीय.

दुसऱ्या बाजूला दिल्लीत देखील परिस्थिती भयानक बनत चालली आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत पाच हजार 100 नवे कोरोनाबाधित आढळले. यासह दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या सहा लाख 85 हजार झाली आहे. त्यापैकी सहा लाख 56 हजार कोरोनाबाधित बरे झाले असून काल दिवसभरात 2हजार 340 जण बरे झाले तर सतरा जणांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला.

कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत असल्याने राजधानी दिल्लीत येत्या 30 एप्रिल पर्यंत रात्री दहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

खाजगी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. फळं भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, औषध विक्रेते, माध्यम कर्मचाऱ्यांना इ पास बाळगावा लागेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!