Share

धक्कादायक! पोलिसाच्या अत्याचारामुळे पत्नीची आत्महत्या, पतीनेही घेतला गळफास

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर याच्या वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीने देखील स्वत:ला संपवून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये आत्महत्येचे कारण सांगितले आहे. व्हिडिओमध्ये पत्नीच्या आत्महत्येस देखील पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर यालाच जबाबदार धरले आहे. शिवाय सासरच्या लोकांनी देखील त्यांचे जीवन नकोसे केल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. सासरच्या लोकांच्या अशा वागण्यामुळे कोळेकरच्या विरोधात मी कसा लढा देऊ असा सवाल त्यांनी विचारला होता. व्हिडिओमध्ये आत्महत्या करणार असल्याचे बोलत असून, त्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

आत्महत्या करण्याचे कारण सांगताना त्यानी म्हटले आहे की, हरिभाऊ कोळेकर यांनी माझे कुटुंब उद्धवस्त केले आहे. माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार अत्याचार केला.त्यानंतर माझ्या पत्नीने आत्महत्या केली. हरिभाऊ कोळेकरला वाटते की तो या प्रकरणातून सहज बाहेर पडेल. मात्र पोलिसांनी त्याला फाशी द्यावी अशीही विनंती यामध्ये केली आहे. या प्रकरणाने पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली असून अटक असलेल्या कोळेकर याच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!