Share

आज ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेची शक्यता…

Published On: 

नवी दिल्ली: येत्या काही महिन्यात देशात ५ राज्यांच्या विधान सभा निवडणुका पार पाडणार आहेत या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली असून विशेषतः पश्चिम बंगाल मध्ये मायावतींची सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, तमिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम, केरळ या राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत.

दरम्यान, आता या राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगा ची आज बैठक पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका पार पडणार आहेत. याआधी कोरोना काळात बिहार विधानसभेची निवडणूक यशस्वीरित्या पार पडली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगची आज संध्याकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. आज पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन दिवसापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. गेल्या दोन महिन्यांपासून निवडणूक आयोगाची पथकं या पाचही राज्यांच्या वारंवार दौऱ्यावर होते. या पथकांनी रिपोर्ट्सही तयार केले आहेत. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाक डे जाऊन काही मागण्याही केल्या आहेत. खासकरून बंगालमध्ये भाजप ने सेंट्रल फोर्सची मागणी केली होती. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत काय घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!