🕒 1 min read
पुणे : राज्यभर पूजा चव्हाण आणि मंत्री संजय राठोड यांच्या कथित संबंधाची जोरदार चर्चा आहे. संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अशातच पूजा चव्हाणची शेवटची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळे अजून नव्या चर्चांना उधाण आले आहे.
पूजा चव्हाण हिने आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर टीका केलेली आहे. पूजाने भालचंद्र नेमाडे यांचा ‘नालायक खान्देशी लेखक’ असा उल्लेख केला आहे.
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1378896569126929&id=100010197963450
‘आठ हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती व्यापार, चिकित्सा, जहाज बांधणी, इंजिनिअरिंगमध्ये एवढी उन्नत कशी इतिहासकार याचा शोध करत आहे आणि हा नालायक खान्देशी लेखक भालचंद्र नेमाडे देशी दारू पिउन त्यावर कादंबरी लिहीत आहे…असल्या मतिमंद लेखकाचा जाहीर निषेध’, अशा आशयाची फेसबुक पोस्ट करत पूजा चव्हाणने नेमाडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय आहे भालचंद्र नेमाडे प्रकरण
परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार म्हणू भालचंद्र नेमाडे परिचित आहेत. त्यांच्या लिखाणावरून नेहमीच वादविवाद सुरु असतात. नेमाडे यांनी कोसला, बिढार, जरीला, हूल, तुकाराम, हिंदू यांसारख्या दर्जेदार ग्रंथांची निर्मिती केली आहे.
‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला २०१४ साली साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या कादंबरीत लभाण-बंजारा समाजातील स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह लेखन केले आहे. त्यामुळे हा पुरस्कार परत घेण्याची मागणी केली जात आहे.
‘लेखक नेमाडे यांना तात्काळ अटक करावी. तसेच त्यांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा व कादंबरीच्या विक्रीवर तत्काळ बंदी आणावी’, अशी मागणी बंजारा समाजाकडून होत आहे. नेमाडेंविरुद्ध काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले गेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांकडून मराठा समाजाची चेष्टा, परिणाम वाईट होतील; आंदोलकांचा इशारा
- पदवी परीक्षा १६ मार्चपासून; सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणार; ऑनलाइन, ऑफलानचीही सुविधा
- पाणी भरण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे कारावास
- जालना जिल्ह्यात कोरोनाचे २ बळी, ८५ नव्या रुग्णांची भर, २१ जणांना डिस्चार्ज
- परभणीत चिंता वाढली! ४१ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
