Share

‘कसोटी सामान दोन दिवसात संपवला आता अदानी पोर्ट, रिलायन्स रिफायनरीत फिरायला जा’ ! जाफरची मजेशीर स्टोरी 

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये होणारी ही डे-नाईट कसोटी म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी खास पर्वणीच ठरली आहे.

अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. सामन्यात एकूण ११ बळी घेणारा अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

अश्विनने ४८ धावांत ४ बळी घेतले आणि ४०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या विशेष क्लबमध्ये स्थान मिळवले. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात ८१ धावांत गारद झाला. भारताविरुद्ध त्यांची ही दुसरी नीचांकी धावसंख्या ठरली. तिसरी कसोटी दोन दिवसात संपल्यानंतर टीम इंडियाचा उर्वरित तीन दिवसांचा प्लान काय असेल, याबाबतची एक मजेशीर इस्टास्टोरी पोस्ट केली. त्यानं काल सायंकाळी ७.५१ ला ही स्टोरी पोस्ट केली. पण, आता त्यानं ती बदलली आहे.

जाफरच्या इस्टा स्टोरीत तिसऱ्या कसोटीच्या उर्वरित तीन दिवसांचा टीम इंडियाचा कार्यक्रम जाहीर केला गेला आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे आज टीम इंडिया अदानी पोर्टवर, तर उद्या रिलायन्स रिफायनरीला भेट देणार आहे. पाचव्या दिवशी गिर अभयारण्यात जाणार असल्याचे दिसत आहे. जाफरची ही गमतीदार इस्टा स्टोरी व्हायरल होत आहे. पण, त्यावरून ट्रोल होताना दिसताच त्यानं ती बदलली आहे आणि आता त्यानं इंस्टा स्टोरी ब्लॉक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!