🕒 1 min read
मुंबई- मीरा भाईंदर-ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा 30 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. ब्राँझ धातूच्या या पुतळ्यासाठी 2 कोटी 95 लाख रुपयांची निविदा काढून शिल्पकार नेमण्यात येणार होता. याचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या स्थायी समितीसमोर आला असता त्याला भाजप सदस्य दिनेश जैन यांनी विरोध केला.
विशेष म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मीरा-भाईंदरमधील अश्वारूढ पुतळ्याला विरोध करणाऱ्या दिनेश जैन यांच्या गळ्यात भाजपने स्थायी समितीचे सभापतीपदाची माळ टाकली आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी संपूर्ण ताकद लावत सभापतीपदाची माळ जैन यांच्या गळ्यात घातली असल्याची चर्चा आहे.
जैन हे मेहता यांचे कट्टर समर्थक असल्यानेच त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करूनही या महत्त्वाच्या पदाची माळ गळ्यात घातल्याचे बोलले जात आहे.निवडणूक पार पडेपर्यंत नरेंद्र मेहता पालिकेत ठाण मांडून होते. दरम्यान,शिवसेनेने स्थायी समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
दरम्यान,आ.प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात भाजप सदस्यांनी बहुमताच्या जोरावर रद्द केलेला ठराव खंडित करण्याची मागणी केली. तसेच स्थायी समितीचा हा ठराव त्वरित शासनाकडे पाठवा, आम्ही महाराजांच्या पुतळ्याचा प्रस्ताव सरकारकडून मंजूर करून आणू, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांकडून मराठा समाजाची चेष्टा, परिणाम वाईट होतील; आंदोलकांचा इशारा
- पदवी परीक्षा १६ मार्चपासून; सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणार; ऑनलाइन, ऑफलानचीही सुविधा
- पाणी भरण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षे कारावास
- जालना जिल्ह्यात कोरोनाचे २ बळी, ८५ नव्या रुग्णांची भर, २१ जणांना डिस्चार्ज
- परभणीत चिंता वाढली! ४१ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
