Share

‘शरद पवार असल्या गलिच्छ गोष्टीचं समर्थन करणार नाहीत, त्यांना चुकीची माहिती दिल्याची शक्यता’

Published On: 

पुणे : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे. यासंदर्भात काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

याच प्रकरणा संदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुण्याचा दौरा करत ज्या इमारतीवरून पूजा चव्हाणने उडी मारत जीवन संपवलं त्या इमारतीची पाहणी केली. यानंतर, त्यांनी थेट वानवडी पोलीस ठाण्यात दाखल होत सदर प्रकरणाच्या चौकशी बाबत पोलिसांना विचारणा केली. पुणे पोलिसांची भूमिका ही संदिग्ध असून ज्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी उत्तरे देत आहेत त्यावरून साफ समजतय की ते अत्यंत दबावात आहेत, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत यावर सविस्तर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांच्या भूमिकेविषयी चित्रा वाघ यांना प्रश्न करण्यात आला असता त्या म्हणाल्या, आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनात घडलो आहोत. आज माझा पक्ष वेगळा असला तरी खात्रीने सांगते ते असल्या गलिच्छ गोष्टीचं समर्थन करणार नाहीत. मात्र, जर पोलीस हे महासंचालकांना खोटी माहिती देत असतील तर शरद पवारांना देखील याबाबत चुकीची माहिती पुरवली गेली असेल. जेव्हा ते सर्व पुरावे व घटना बारकाईने लक्षात घेतील तेव्हा संजय राठोड यांचा अपराध त्यांच्या देखील लक्षात येईल,’ असं भाष्य चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!