Share

वडिलांच्या आठवणीत गोपीनाथ गडावर प्रितम मुंडेंकडून फुलांची आरास

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीडच्या खासदार प्रितम मुंडे सध्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी परळीतील गोपीनाथ गडावर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वडिलांच्या प्रतिमेसमोर आणि स्मृतीस्थळावर आकर्षक फुलांची सजावट केली.

https://www.facebook.com/DrPritamMunde/posts/1652051821652021

खासदार डॉ. प्रितम मुंडे आणि पंकजा मुंडे या परळीत आल्यावर नेहमी गोपीनाथ गडाला भेट देत असतात. येथे येऊन वडिलांच्या स्मृतीला अभिवादन करतात. मात्र, काही वेळेस दोघी बहिणी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करतात. प्रितम यांनी आज गुरुवारी गोपीनाथ गडाला भेट दिली. यावेळी त्यांनी वडिल गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेसमोर, स्मृतीस्थळावर फुलांची मनमोहक सजावट केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बेघर आणि निराधार नागरिकांनी हक्काचे मिळवून देण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांनी दिली. केज येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थींना पहिल्या हफ्त्याच्या धनादेशाचे वितरण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नमिता मुंदडा यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्नास लोकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी कार्यक्रम पार पडल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!