🕒 1 min read
अहमदाबाद : सध्या पंत कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत येत आहे. त्याच्या मजेशीर व्यक्तिमहत्वामुळे तो या कसोटी सामन्यांमध्ये बराच चर्चेत आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या रिषभ पंतचा जलवा इंग्लंडविरुद्ध होत असलेल्या कसोटी मालिकेतही दिसून येत आहे. पंतने या मालिकेत देखील आपल्या फलंदाजी आणि यष्टिरक्षनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रिषभ पंतच्या यष्टिरक्षणावर अनेक दिग्गजांनी टीका केली होती. परंतु आता तो उत्कृष्ट कामगिरी करून त्या टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. सोबतच तो आपल्या यष्टीमागील कृत्याने दर्शकांचे मनोरंजनही करताना दिसतो. त्याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यष्टिरक्षण करत असताना अतिशय मजेशीर कृत्य केले.
आर अश्विन गोलंदाजी करत होता. अश्विनने टाकलेल्या चेंडूवर इंग्लंडचा खेळाडू जॅक लीचने शॉट मारला आणि धाव घेण्याचा विचार केला. इतक्यात यष्टीमागे असलेल्या पंतने आगळावेगळा आवाज काढायला सुरुवात केली. त्यामुळे लीच घाबरला आणि गोंधळून त्याने धाव घेण्यापासून माघार घेतली. पंतचा हा गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पंतचा आवाज ऐकून लीचने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला नाही, याचा सोशल मीडियावर चांगलाच हशा पिकला आहे.
https://www.instagram.com/p/CLrq2sNBewU/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- दिवंगत विमलताईंचे स्वप्न सून नमिता मुंदडाकडून पूर्ण
- हिंगोली जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण
- आरटीओ कार्यालयाची फसवणूक, चौघांविरूध्द गुन्हा दाखल
- बलात्काऱ्यांना वाचवणे हाच महाराष्ट्र सरकारला एकमेव उद्योग राहिलाय : चित्रा वाघ
- पाथरीत जीममधून पोलिसांनी केले पिस्टल जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
