Share

मराठा समाजाचा आक्रोश मेळावा, ‘माझे आरक्षण, माझी जबाबदारी’

Published On: 

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगावात आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ७ मार्च रोजी आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी ‘माझे आरक्षण, माझी जबाबदारी’ ही टॅग लाईन करण्यात आली आहे.

साष्टपिंपळगाव इथल्या या आक्रोश मेळाव्याच्या निमित्ताने सकल मराठा समाज एकत्र येत आहे. मराठा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्र येणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सध्या साष्टपिंपळगाव इथे सुरू आहे. परिसरातील अनेक गावातील लोकही या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. सरकारला जागे करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे, याची जाणीव सरकारला करून देण्यासाठी हा आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्या संदर्भात विविध जिल्ह्यातील मराठा समाजाचे प्रतिनिधी साष्टपिंपळगावमध्ये दाखल होणार आहे. या मेळाव्यात सकल मराठा समाजातील बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्यस्तरीय ठिय्या आंदोलनाच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!