जुन्नर : शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे एक वादग्रस्त फलक लावण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्यावर सुशोभीकरणासाठी अनेक उद्याने निर्माण करण्यात आली आहेत. या उद्यानांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत स्वराज्य उभं करण्यात महत्वाचा वाटा असलेल्या शूर सरदारांचं, मावळ्यांचं नाव देण्यात आलं आहे.
मात्र, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका उद्यानाच्या नावावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या उद्यानाला सिद्दी इब्राहिम खान यांचं नाव देण्यात आलं आहे. याबाबतचा फलक देखील वन विभाग, जुन्नर तर्फे लावण्यात आला आहे. मात्र, सिद्दी इब्राहिम खान यांचं नाव हे केवळ राजकीय फायद्यासाठी देण्यात आलं असून इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप भाजयुमो कडून करण्यात आला आहे.
‘सिद्दी इब्राहिम खान (तोफखाना प्रमुख) असा उल्लेख करण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फौजेत सिद्दी इब्राहिम खान नावाची व्यक्तीच नव्हती. याच प्रमाणे इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात तोफखाना प्रमुख असे पद असल्याचे कोठेही नमूद केलेलं नाही. यासोबतच, शिवाजी महाराज व अफझल खान यांच्या भेटीवेळी सिद्दी इब्राहिम खान हे देखील अंगरक्षक म्हणून गेल्याच या फलकावर नमूद करण्यात आलं आहे, मात्र या भेटी वेळी ३ नव्हे तर १० अंगरक्षक महाराजांच्या समवेत होते. या १० जणांमध्ये कोणाचेही नाव ‘सिद्दी इब्राहिम खान’ नव्हते,’ असं भाष्य भारतीय जनता युवा मोर्चाचे ऍड. प्रदीप गावडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना केलं आहे.
पुढे ते म्हणाले, ‘केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या उद्यानाचे नामकरण सिद्दी इब्राहिम खान उद्यान करून तेथे सिद्दी इब्राहिम खान यांच्या नावाचा धाधांत खोटी माहिती असणारा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या व असंख्य मावळ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाची मोडतोड करणारा आक्षेपार्ह फलक लावण्यात आला आहे, सदर फलक तात्काळ काढण्यात यावा अशी मागणी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना केली, हा आक्षेपार्ह फलक न काढल्यास शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागेल.’ असा इशारा देखील प्रदीप गावडे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
- घरबशा मुख्यमंत्र्यांनी आधी केले मग सांगितले ; भाजप नेत्याची जहरी टीका
- इंग्लंडचे ‘अक्सर’शः लोटांगण; ११२ धावांमध्ये भारताने इंग्रजांना धाडलं माघारी
- इशांत शर्माची १०० व्या कसोटीत इंग्लंडला मोठा धक्का देत धडाकेबाज सुरुवात !
- संजय राठोड यांना आधी चपलेनं झोडपल पाहिजे : चित्रा वाघ
- राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार – नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
