Share

औरंगाबाद मनपा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा विचार करावा का?

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अन्य राजकीय पक्षांसमवेत आघाडी करण्याबाबत स्थानिक नेत्यांचे अभिप्राय घेऊन त्यानंतर प्रदेश पातळीवर अंतिम निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीचाही समावेश आहे. मात्र, सध्याची औरंगाबाद काँग्रेसची स्थिती पाहता या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढल्यास काँग्रेसच्या निवडणुकीनंतरच्या स्थिती बाबत संभ्रम निर्माण होतो.

एकेकाळी काँग्रेसचा महापौर राहिलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेत काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ ८ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती याही पेक्षा खराब असली तरी, सध्या राष्ट्रवादीला चांगले दिवस आले असल्याचे दिसून येतय. त्यातच पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे आधीच जाहीर केले आहे. तर काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यासह स्थानिक नेते मात्र, स्वबळाची भाषा करत आहे. मात्र, तसे झाल्यास काँग्रेसला फायदा होईल की नुकसान याचा अभ्यासक अंदाज बांधत आहेत.

माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष कार्याकडे लक्ष दिलेले नाही. माजी आमदार कल्याण काळे यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली असली तरी, अजूनही ते फुलंब्री मतदार संघातच अडकून आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसचा नेता म्हणावे असा एकही चेहरा दिसत नाही. त्यातच इतर स्थानिक नेते मनपा निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट करत आहेत. तसे झाल्यास पक्षातील कार्यकर्त्यांना चालना मिळते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र, त्याचा पक्षाला फायदा होईलच याची शाश्वती देता येत नाही. या सर्वात स्थानिक नेते महाविकास आघडीचा आग्रह धरतात की, स्वबळाचा नारा कायम ठेवतात हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!