🕒 1 min read
बीड : बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी पोस्ट करून मास्कचा सतत वापर करा, शासकीय नियमांचे पालन करा. गर्दी करणे टाळा असे सांगितले आहे.
https://www.facebook.com/DPMunde/posts/2931833190379625
यावर राष्ट्रवादीचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी धनंजय मुंडेंना सल्ला देणारी पोस्ट शेअर केली आहे. ”प्रिय धनंजय जी,
कृपया मास्कचा वापर करा, विना मास्क आपले फोटो व्हायरल झाले आहेत” असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे. त्याखाली मुंडे यांचे मास्कविनाचे फोटोही अपलोड केलेत. दरम्यान काही वेळातच गायकवाड यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि परत टाइमलाईनवर अपलोड केली.
https://www.facebook.com/jaysingraogaikwad.patil.9/posts/5058747620863561
दरम्यान, जयसिंगराव गायकवाड यांनी सामान्य शेतकरी कुटुंबातील आणि राजकीय वारसा नसताना त्यांनी दोन दशके राजकारणात महत्त्वाची पदे भूषवली. दोनदा पदवीधर आमदार, युतीकाळात सहकार राज्यमंत्री, केंद्रातही दोनदा राज्यमंत्रिपद आणि बीड मतदारसंघाचे तीन वेळा खासदारपद त्यांनी भूषवले. त्यातील खासदारकीची एक खेप ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या मुशीत तयार झालेल्या गायकवाड यांची कारकीर्द जनसंघात सुरू झाली. भाजपने त्यांना अनेक संघटनात्मक पदे दिली. गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर राहून, मराठवाड्यात भाजप वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
गायकवाड हे धनंजय मुंडे यांना राजकारणात खूप सिनिअर आहेत. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने धनंजय यांना सोशल मीडियावर मास्कबाबत सल्ला दिल्याची जाणवते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गायकवाड यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता सरकारी कार्यालयात प्रवेशासाठी कोरोना टेस्ट अनिवार्य
- भाजप राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे; वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर
- दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 5 राज्यांतील नागरिकांवर देखील निर्बंध
- ‘पालघर साधू हत्याकांडापासून पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे’
- विमानप्रवाशांसाठी खुशखबर! नांदेडहून जळगाव, अहमदाबादला विमानसेवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
