Share

“एखाद्या राजासारखे होऊ नका, जमीनीशी नातं असणारा नेता व्हा”, मोदींचा भाजप नेत्यांना कानमंत्र

Published On: 

नवी दिल्ली : रविवारी पंतप्रधान मोदींनी भाजपाचे नेते, राज्यातील प्रभारी, अध्यक्ष आणि सचिवांची बैठक घेतली. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी अनेक नेत्यांना आपल्या भाषणातून अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचे मत अनेक नेत्यांनी वक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पार्टीच्या वरीष्ठ नेत्यांसमोर भाषण करताना त्यांना लोकांशी नाळ अधिक घट्ट करण्याचा सल्ला दिला आहे. “एखाद्या राजासारखे होऊ नका. जमीनीशी नातं असणारा नेता व्हा,” असा सल्ला मोदींनी नेत्यांना दिला आहे.

द प्रिंटने दिेलेल्या वृ्त्तानुसार पंतप्रधान मोदींनी सर्व नेत्यांना पक्ष कार्यकर्त्यांशी अहंकाराने वागू नये असा सल्ला दिलाय. या कार्यकर्त्यांनीच तुम्हाला नेता बनवलं आहे याची आठवही मोदींनी नेत्यांना करुन दिलीय. तसेच सत्ता मिळवणे हा पक्षाचा मुख्य हेतू नसून लोकसेवा हा हेतू असल्याचेही मोदींनी या बैठकीमध्ये म्हटलं आहे.

पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला तोंड देताना तेथील स्थानिक भाजपा नेतृत्व संवाद साधण्यात आणि आपलं म्हणणं मांडण्यात अपयशी ठरल्याचे चित्र दिसत असल्याने मोदींनी हा इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ भाजपा नेत्याने दिल्ल्या माहितीनुसार पंतप्रधांनांनी या तिन्ही शेती कायद्यांचे काय फायदे होणार आहे हे नेत्यांनी जनतेपर्यंत पोहचवावं, असं आवाहन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!