🕒 1 min read
बीड : गेवराई तालुक्यातील काळेगाव येथील हनुमान महाराज गिरी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर सोशल मीडियावर आपण आत्महत्या करत आहोत असा व्हिडीओ व्हायरल करून महाराज गायब झाले होते. गेल्या १५ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या हनुमान महाराज गिरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचा जामिन अर्ज न्यायालयात दाखल झाला आहे.
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील सुर्य मंदिर संस्थानातील हनुमान महाराज गिरी यांच्यावर चकलांबा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी तसेच अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल आहे. परंतू सदरचा गुन्हा हा केवळ ब्लॅकमेंलिगसाठी असून गावातील सरपंच, पुढारी, पत्रकारांनी तसेच फिर्यादीच्या नातेवाईक यांनी मला चार लांख रुपयांची मागणी केली होती. मी ती मागणी पुर्ण केली नाही म्हणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याने मी आत्महत्या करत आहे असा व्हिडिओ हनुमान महाराज यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
या व्हिडिओने सर्वत्र खळबळ माजली. मात्र, तेव्हापासून हनुमान महाराज गायब होते. महाराज नेमके कोठे आहेत याचा शोध पोलीस यंत्रणा घेत होती. अखेर महाराज पंढरपूरला असल्याची माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांना ते सापडले नाहीत. दरम्यान आता पोलिसांना गुंगारा देणाऱ्या हनुमान महाराज गिरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी थेट बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. न्या.के.आर.पाटील यांच्यासमोर हनुमान महाराज गिरी यांचे अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नारायणगडासाठी पंकजा मुंडेंनी घोषणा केली, निधी मात्र दिला नाही-धनंजय मुंडे
- सोशल मीडियावर ब्रह्मज्ञान, निवडणूक अर्ज भरताना कोरडे पाषाण!
- अहो दानवेजी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ऐकायचं नाही असं ठरवलं काय?
- भाजप आ.नमिता मुंदडा यांनी केली मागणी, महाविकास आघाडी सरकारने घेतली दखल
- देवीच्या गावात महिला उपेक्षित! नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव, पण पदावर पुरूष विराजमान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
