Share

शिवसेनेला जैस्वालांचे वावडे का?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करणारे आमदार प्रदीप जैस्वाल आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश जैस्वाल यांच्या कार्यकर्त्यांना युवा सेनेच्या पदाधिकारी मंडळातून डावलण्यात आलंय. शिवसेनेने जैस्वाल यांना डावलण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जैस्वाल यांना डावलण्यात आले होते. माजी महापौर विकास जैन यांना तिकीट दिल्याने तत्कालीन विद्यमान आमदार असलेले जैस्वाल अपक्ष मैदानात उतरले होते. त्यावेळी देखील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला पाडत जैस्वाल यांनी विधानसभा गाठली होती.

औरंगाबादच्या राजकारणामध्ये आक्रमक आणि प्रभावी नेता म्हणून प्रदीप जैस्वाल यांच्याकडे पाहिले जाते. समाजातील सर्वच घटकांमध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, तो सोडवण्याची ताकद देखील जैस्वाल यांच्या मध्येच आहे. असे असतांना २००९ मध्ये प्रदीप जैस्वाल तर आता ऋषिकेश जैस्वाल यांना डावलण्याचं कारण काय? हाच खरा प्रश्न.

युवासेनेच्या कार्यकारणी मध्ये समावेश होण्यासाठी मी मुलाखत दिली नव्हती, असे जरी ऋषिकेश जैस्वाल स्पष्ट करत असले तरी त्यांची ती मनोमन इच्छा होती, हे लपलेले नाही. सध्या ऋषिकेश हे महानगरपालिका निवडणुकीची तयारी करत आहेत. मात्र, मनपा निवडणुकीतही तिकिट मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. युवा सेना पदाधिकारी निवड ही महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा एक भाग असल्याचे ऋषिकेश जैस्वाल हे स्वत: सांगतात. असे असताना त्यांना डावलण्याचे अनेक राजकीय अर्थ निघत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!