🕒 1 min read
मुंबई : देशासह राज्यात नियंत्रणात आलेल्या कोरोनानं पुन्हा जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांची होणारी गर्दी पाहता कार्यालयीन वेळा बदलण्याची भूमिका मांडली आहे.
कोरोनाशी लढा संपलेला नाही. त्यामुळे कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत केली होती.
दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावरून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले आहे. ‘१० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय? मंत्रालयात न जाता घरी बसून राज्याचा कारभार हाकणारे (????) मुख्यमंत्री. अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी… मग दुसऱ्यांना सल्ला द्या’, अशा आशयाचे ट्वीट करत भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
कोरोना काळात उद्धव ठाकरे फारसे जनतेमध्ये मिसळेलेले पाहायला मिळाले नाहीत. प्रत्यक्षरित्या त्यांचा जनतेशी संपर्क कमी होता. मुख्यमंत्री फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस थेट फिल्डवर जाऊन जनतेचे प्रश्न सोडवत होते. याचाच संदर्भ घेत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; जालन्यात संपूर्ण गाव सील; परभणीत आठवडी बाजार बंद
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- परभणीत ३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
- दीक्षाभूमी एक्स्प्रेसने मार्ग बदलला; जालना-औरंगाबादेतील उत्तर भारतीय नागरिकांची गैरसोय
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
