Share

फेसबुकवरील मैत्रीचे प्रेमात रुपांतर; पोलिसांनी लावला प्रेमी युगुलाचा विवाह

Published On: 

🕒 1 min read

परभणी : गंगाखेड पोलिसांनी फेसबुकवरून प्रेमात पडलेल्या प्रेमी युगुलाचा विवाह कायदेशीर पद्दतीने लावून दिलाय. सहा महिन्यांपूर्वी मध्यप्रदेश येथील तरूणीची आणि गंगाखेड येथील तरूणाशी फेसबुकवरुन मेत्री झाली. त्यांनंतर तिचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, घरच्यांच्या विरोधामुळे या प्रेमी युगुलाने गंगाखेड पोलिसांची मदत घेतली. दोघेही सज्ञान असल्याने गंगाखेड पोलिसांनी १९ फेब्रुवारी रोजी चिंतामणी मंदिरात या दोघांचा विवाह लावून दिला.

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपानगर येथील २० वर्षीय तरूणी आरती (नाव बदललेले आहे) आणि गंगाखेड येथील २४ वर्षीय तरूण राकेश (नाव बदललेले आहे) हे दोघे गंगाखेड पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलीस निरिक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी त्यांची चौकशी केली.दरम्यान, आरतीच्या वडिलांनी ती मिसिंग असल्याची तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली.

यानंतर पोलिस निरिक्षक बोरगावकर यांनी मुलीच्या आई-वडिलांनी मध्य प्रदेशातून बोलवून घेतले. यावेळी मुलीने मला याच मुलाशी विवाह करायचा आहे, असा हट्ट धराला. जबरदस्ती केल्यास मी आत्महत्या करेन, असे सांगितले. त्यामुळे पोलिस निरिक्षक बोरगावकर यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून या प्रेमी युगुलाचे लग्न लावून दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!