Share

हिगोली जिल्ह्याला १६० कोटींच्या आराखड्यास मंजूरी; ५८.३२ कोटींची अतिरिक्त निधी

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक सोमावारी पार पडली. या बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात १६० कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा वार्षीक योजना २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १०१ कोटी ६८ लाख रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्याला मंजूरी देण्यात आली आहे. औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तालायत आयोजित राज्यस्थरीय बैठकीत जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांनी ३२२ कोटी २८ लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी केली होती त्यापैकी ५८.३२ लाख रुपये अतिरिक्त निधी वाढवून मिळाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचा वार्षिय नियोजनाचा आराखडा १६० कोटींचा झाला आहे. या आराखड्याला वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यानी मंजुरी दिली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीत मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती मांडली. औंढा नागनाथ आणि सिद्धेश्वर पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध विकासकामांचे सादरिकरण करून अतिरिक्त निधीबाबात मागणी केली. त्यावर हिंगोली जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती निधीमधून कोविड-१९ साठी भौतिक पायाभूत सुविधा, रामलीला मैदानाचे सुशोभीकरण आणि वन पर्यटन यासारखे कामे केल्याबद्दल ५८.३२ कोटींची अतिरिक्त निधी देत असल्याचे सांगून हा निधी जिल्ह्यातील विकास कामांसाठी योग्न नियोजन करून खर्च करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!