Share

बायकोपासून कुटुंबीयांचा विरोध लपवणे ही फसवणूकच, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : बायकोला कुंटुबीयांपासून विरोध हा तिच्यापासून लपवून ठेवणे ही फसवणूकच आहे. घरच्यांच्या विरोधाची कल्पना न देताच तिच्याकडून शरीरसंबंधासाठी मिळवलेली संमती वैध मानता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. मंदिरात केलेले लग्न घरच्यांना मान्य नसल्याचे सांगून बायकोसोबत संसार न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे.

याबाबत लातूरच्या तरुणीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बिहारमधील 30 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याला आव्हान देत आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली होती. यावर न्या.तानाजी नलावडे आणि न्या.मुकुंद सेवलीकर यांच्या खंडपीठाने गुन्हा रद्द करण्यास नकार देत तरुणाची याचिका फेटाळून लावली.

या प्रकरणात आरोपी तरुणाला त्याच्या लग्नाला आई-वडिलांकडून विरोध केला जाऊ शकतो, याची कल्पना होती. मात्र याबाबत त्याने तरुणीला काहीच कळू दिले नाही व लग्न करण्यास तयार असल्याचे सांगून एका देवळात लग्नही केले. आरोपीने लग्न केले म्हणून त्याला शरीरसंबंध ठेवण्यास तरुणीने संमती दिली.

जर आरोपीने घरच्यांच्या विरोधाची कल्पना दिली असती, तर ती शरीरसंबंध ठेवण्यास तयार झाली नसती. तरुणाने आई-वडील माझ्या इच्छेविरोधात जाणार नसल्याचे सांगून तरुणीची संमती मिळवली. घरच्यांचा विरोध अंधारात ठेवून शरीरसंबंध करण्यास मिळवलेली संमती वैध मानता येणार नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. याबाबत ‘सामना’ने वृत्त प्रकाशित केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!