औरंगाबाद : छावणी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम बुधवारी अकरा वाजता आयोजित केला होता. त्या अनुषंगाने जनता दरबारात छावणी परिसरातील लोकांनी हजेरी लावली. परंतु दिलेल्या वेळेच्या दोन तासानंतरही पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता कार्यक्रमास हजर नव्हते.
पोलीस आयुक्तांनी शहरात गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता जनता दरबार हा उपक्रम हाती घेतला आहे. या जनता दरबारात पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांच्या समस्या तसेच तक्रार निवारण करण्यासाठी पोलिस तपासाला गती देण्यासाठी नागरिकांशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या तसेच शंका निरसन करण्यात येत आहे.
यापूर्वी पुंडलिक नगर पोलिस ठाणे अंतर्गत झालेल्या जनता दरबारात लोकांनी चांगलं तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने छावणी येथे जनता दरबार आयोजित केला होता. परंतु पोलीस आयुक्त अकराची वेळ असतानादेखील साडेबारापर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित नव्हते.
महत्वाच्या बातम्या
- दुरावत चाललेल्या ओबीसी मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळविण्याचे भाजपने पुन्हा सुरु केले प्रयत्न
- ‘तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, पवार त्याचे संस्थापक अध्यक्ष’, राष्ट्रवादीकडून खोतांना प्रतिउत्तर
- मुंबईच्या तिरा कामतसाठी औषध आयात करण्यास केंद्राकडून कर माफ, देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश
- तुळजापुरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी रोचकरीनंतर शेकापचे उपोषण
- फक्त गुलाम नबीच नव्हे तर पवार,कंगना,उदयनराजे यांच्यासह ‘या’ दिग्गजांना आठवलेंनी दिली आहे ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
