मुंबई: बँकांच्या संघटनांची मुख्य संस्था असलेला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने १५ मार्च पासून तीन दिवसांच्या संपावर जाण्याची घोषणा केली आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये दोन सार्वजनिक बँकांच्या खाजगी करण्याची घोषणा केली. याविरोधात या संघटनेने हा संप पुकारला आहे.
२०१९ पासून सरकारने १४ बँकांचे खासगीकरण केले आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर या खासगीकरणाला करण्याला विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. पुढील महिन्यात १५ आणि १६ यादिवशी संप तर १४ तारखेला रविवार आल्याने सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.
यामध्ये यु एफ बी यु मध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑफ इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन, एम्प्लॉईज कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांचा समावेश आहे. या बद्दल ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम यांनी माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या
- दुरावत चाललेल्या ओबीसी मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळविण्याचे भाजपने पुन्हा सुरु केले प्रयत्न
- ‘तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, पवार त्याचे संस्थापक अध्यक्ष’, राष्ट्रवादीकडून खोतांना प्रतिउत्तर
- मुंबईच्या तिरा कामतसाठी औषध आयात करण्यास केंद्राकडून कर माफ, देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश
- तुळजापुरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी रोचकरीनंतर शेकापचे उपोषण
- फक्त गुलाम नबीच नव्हे तर पवार,कंगना,उदयनराजे यांच्यासह ‘या’ दिग्गजांना आठवलेंनी दिली आहे ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
