🕒 1 min read
नवी दिल्ली:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान, केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड होणार आहे. कारण सरकारने आंदोलनांच्या ठिकाणी दिल्लीकडे जाणाऱ्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त केला आहे. तसंच बॅरिकेड्सच्या भींतींसह लोखंडी टोकदार सळया रस्त्यांवर लावल्या आहेत.
दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर सीसीची भिंत बनवली आहे. ही भिंत चार फूट जाड आहे. यापासून १० पावलांवर दिल्लीकडे जाणार्या एमसीडी टोलजवळ सीमेवर एक रस्ता खोदण्यात आला आहे आणि सिमेंटमध्ये लोखंडी टोकदार खिळे बसवण्यात आले आहेत. यासह येथे लोखंडी अणुकुचीदार सळया बसवण्यात आल्या आहेत. जेणेकरुन येथून कोणतंही वाहन जाऊ शकत नाही.
महत्वाच्या बातम्या
- या अर्थसंकल्पामुळे लोकांच्या राहणीमानात सुलभता येईल : मोदी
- शेतकऱ्यांचा एल्गार; 6 फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’चा इशारा
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- क्वारंटाइननंतर भारत व इंग्लंड दोन्ही संघ सरावासाठी सज्ज
- इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीसाठी भारताच्या माजी सलामीवीराने निवडली प्लेईंग इलेव्हन

