Share

लातुरच्या सृष्टीचा नॉनस्टॉप लावणीचा विश्वविक्रम

Published On: 

🕒 1 min read

लातूर : प्रजासत्ताक दिनी सांयकाळी लातूरच्या दयानंद सभागृहात एक मुलगी लावणीनृत्य सादर करण्यासाठी स्टेजवर येते आणि पुढील २४ तास लावणीनृत्य सादर करुन विश्वविक्रमाची नोंद करते. ही कोणती परिकथा नसून सत्य घटना आहे. आणि या कथेची नायीका आहे लातूरची सृष्टी जगताप.

लातूर जिल्ह्यातील नववीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने सलग २४ तास लावणीनृत्य केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी तिने सुरु केलेले लावणीनृत्य बुधवारी सायंकाळी थांबवले, आणि विक्रमाची नोंद केली. तिने रचलेल्या या विक्रमाची आशिया बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. बालवयापासूनच सृष्टीला नृत्याची आवड आहे. वय वर्ष पाच असल्यापासून तिने नृत्य स्पर्धेत भाग घ्यायला सुरूवात केली. यापुर्वी तिने १२ तासापेक्षा अधिक काळ नृत्य केले आहे. या विक्रमादरम्यान तीला दर तासाला तीन मिनीटे विश्रांती घेण्याची परवानगी होती.

चोवीस तास संपताच सभागृहात एकच जल्लोष झाला. यानंतर वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षकांनी तिला विश्वविक्रम नोंदीचे प्रमाणपत्र व पदक देऊन सत्कार केला. वेगवेगळ्या स्तरातून सृष्टीचे कौतुक होत आहे. आमदार रोहीत पवार, लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी टि्वट करुन सृष्टीचे अंभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!