Share

गडकरींच्या खात्याकडे टक्केवारी मागणारा बीडचा तो आमदार कोण?

Published On: 

🕒 1 min read

बीड : महामार्गाच्या कामात ठेकेदारांवर दवाब टाकून टक्केवारी मागणाऱ्या 22 आमदारांसह काही खासदारांच्या विरोधात केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी थेट सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. टक्केवारीच्या प्रकरणांमुळे रस्ता कामांना विलंब होत आहे. यामुळे गडकरी चांगलेच चिडले आहे. अनेकदा सांगूनही हे नेत सुधारत नाहीयेत. त्यानंतर आता गडकरींनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. गडकरींनी सीबीआयला दिलेल्या 22 आमदारांच्या यादीत बीड जिल्ह्यातील एका आमदाराचाही समावेश असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील हा आमदार कोण याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर मार्गाचे काम आयआरबी कंपनीमार्फत ज्यावेळी सुरू झाले, त्यावेळी त्यातील काही काम आपल्या कार्यकर्त्याला द्यावे त्यासाठी त्या त्या विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधीनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याची तक्रार त्यावेळी ही झाली होती. मात्र, आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. एवढेच नव्हे तर बीड शहरातून जाणाऱ्या बिंदूसरा नदीवरील पुलाच्या कामातही संबंधीत कंपनीला एका लोकप्रतिनिधीने मोठी रक्कम मागितल्याची चर्चाही त्यावेळी झाली होती.

शासकीय निधीतून होणाऱ्या कामांत लोकप्रतिनिधी आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारावर दबाव टाकून टक्केवारी मागणे आणि विशेषत: स्वत:च्या मतदारसंघात मंजूर करुन आणलेली कामे ठेकेदाराला देण्यासाठी टक्केवारी घेतल्याचा प्रकार जिल्ह्याला नवा नाही. यापूर्वीही असे प्रकार अनेक घडले आहेत. मात्र पालखी मार्ग आणि इतर महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या कंत्राटदारांना धमक्या देवून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत.

केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर नांदेडपासून औरंगाबादपर्यंत महामार्गाच्या कामामध्ये अशा स्वरूपाच्या तक्रारी कंत्राटदारांनी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्या होत्या. गडकरींनी अधिकारी आणि कंत्राटदारांकडून संविस्तर लेखी स्वरूपात तक्रारी प्राप्त करून घेतल्या आणि स्वतः केंद्रीय गुन्हा अन्वेशन विभागाकडे सविस्तर तक्रार केली आहे. ही तक्रार केल्याची बातमी माहित झाल्यावर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या नावाची चर्चा होवू लागली. गेल्या आठवडाभरापासून बीड जिल्ह्यातील एका आमदाराचे नाव चर्चेत आहे. मात्र, तो आमदार कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!