पुणे : पुणे महानगरपालिकेचे यावर्षाचे अंदाजपत्रक पालिका आयुक्त विक्रम कुमार उद्या २९ जानेवारी रोजी सादर करणार आहेत. लॉकडाऊनमध्ये पालिकेचे उत्पन्न कमालीचे घटले होते. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात पुणेकरांना विकासाच्या दृष्टीने नेमके काय मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
२०२० ते २०२१ च्या सुरुवातीपर्यंत पालिकेला ३ हजार २८५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पालिकेने २ हजार ९९३ कोटी रुपये खर्च केले आहेत.पालिकेकडे अवघे २५० ते ३०० कोटी रुपये सध्या शिल्लक आहेत. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात आयुक्त पालिकेवर कोणता भार टाकणार आणि किती तरतूद करणार हे पाहणे पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असणार आहे.
पुणे पालिकेला २०२० ते २०२१ दरम्यान किती उत्पन्न मिळाले याचा तपशील.
१ एप्रिल २०२० ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत पालिकेला ३ हजार २८५ कोटी रुपये मिळाले आहेत.
त्यापैकी एलबीटी २५ कोटी रुपये.
जीएसटी १५३२ कोटी रुपये.
मिळकर कर १०१६ कोटी रुपये.
बांधकाम शुल्क २८२ कोटी रुपये.
पाणीपट्टी २०१ कोटी रुपये.
शासकीय अनूदान ७१ कोटी रुपये.
आणि इतर १५८ कोटी रुपये.
महत्वाच्या बातम्या
- पक्षविरोधी भूमिकेचे आ. सावंत यांच्याकडून खंडण
- ‘शेतकरी नेत्यांनी दिलेलं वचन पाळलं नाही;आता आमच्याकडून कोणतीही दया दाखवली जाणार नाही’
- उद्या केंद्रीय राज्यमंत्री अंतिम पत्र घेऊन अण्णा हजारेंची भेट घेणार; गिरीश महाजनांची माहिती
- ‘नामांतर हे बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी नाही तर शिवसेनेला स्वत:चा अजेंडा चालवण्यासाठीच’
- भारताविरुद्ध लाजिरवाण्या परभावानंतर; ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडला बाहेरचा रस्ता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

