Share

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन आता राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली आहे.

त्यानंतर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी दर्पोक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलंय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवडी यांना फटकारले आहे. जी गावं वादग्रस्त आहेत ती केंद्रशासित करावीत असं आपले मुख्यमंत्री म्हणाले. त्याला उत्तर देताना कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेथील लोकांना खूश करण्यासाठी मुंबई केंद्र शासित करा, असं म्हणाले असतील, असं सांगत त्यांच्या विधानाला कवडीचा आधार नाही, असं अजितदादा म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!