Share

देशभरातून दिल्ली पोलिसांच्या संयमाचे कौतुक होत असताना दिग्विजय सिंहांनी केले ‘हे’ गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली.

या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. देशभरातून दिल्ली पोलिसांनी प्राणपणाने लढत दाखविलेल्या अतुल्य पराक्रमाचे धैर्याचे आणि संयमाचे कौतुक होत असताना याबाबत काँग्रेस नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले. सिंह म्हणाले, “शेतकरी संघटना व पोलिसांमध्ये चर्चा झाल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चासाठी तीन मार्ग ठरवण्यात आले होते. सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाजीपूर बॉर्डर या मार्गांवरून ट्रॅक्टर रॅली निघाली होती. सिंघू बॉर्डर व टिकरी बॉर्डरवर ट्रॅक्टर रॅलीला काहीच अडचण आली नाही”.

गाजीपूर बॉर्डर फक्त अडचण निर्माण झाली, कारण दिल्ली पोलिसांनी जो मार्ग दिला होता, त्यांनी तो बदलावा म्हणून तिथं बॅरिकेड्स लावले गेले होते. शेतकऱ्यांनी जेव्हा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला आणि लाठीमार केला. यामुळे परिस्थिती चिघळली आणि हेच कारण ठरले”असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनंतर दिल्ली पोलिसांनी एकूण २५ खटले दाखल केले आहेत.काही शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटन आणि भारतीय किसान युनियन या संघटनांनी आंदोलनातून माघार घेतल्याचं काल जाहीर केलं.

आंदोलनातील काही घटक वेगळ्याच दिशेनं जात असल्यामुळे आपण आंदोलनातून माघार घेत असल्याचं राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक वी. एम. सिंग यांनी सांगितलं; तर काल दिल्लीत जे काही घडलं ते अत्यंत खेदजनक आहे, असं सांगत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष ठाकूर भानु प्रताप सिंग यांनी आपला निर्णय जाहीर केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!