🕒 1 min read
मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आज सोमवार दि.25 जानेवारी रोजी 5 दिवसांच्या दुबई दौऱ्यावर रवाना झाले.
दि. 26 जानेवारी रोजी भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन रामदास आठवले दुबईत साजरा करणार आहेत. दि.26 जानेवारी रोजी सकाळी दुबईतील अल हमरिया,डिप्लोमॅटीक इन्कलेव्ह येथील भारतीय उच्चायुक्तालयात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भारतीय तिरंगा राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून 72 वा प्रजसत्ताक दिन दुबईत साजरा करण्यात येणार आहे.
संयुक्त अरब अमिरतीत दुबई आणि अबुधाबी या शहरांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भेट देणार आहेत.पाच दिवस आठवले संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान अबुधाबी येथे टी-10 क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आठवले यांच्या हस्ते होणार आहे.या दौऱ्यात आठवले यांच्या समवेत त्यांचे पूत्र कुमार जित आठवले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कोणी कितीही भुंकले तरी फरक पडत नाही; कॉंग्रेस आमदाराचा शिवतारेंना टोला
- अभिमानास्पद ! राज्यातील ५७ शूर पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाचा सन्मान
- ‘अनाथांची माई’ सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
- लोककला जपणाऱ्या कोकणातील परशुराम गंगावणे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर !
- जय हिंद…पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

