मुंबई : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महाराष्ट्राचे शेतकरीही सामिल होत आहेत. राज्याच्या २१ जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच १८० किलोमीटरपर्यंत रॅली काढत शनिवारी रात्री मुंबईत पोहोचले आहेत. आज शेतकरी आंदोलनानिमित्त आझाद मैदानात संयुक्त शेतकरी आंदोलनाची सभा पार पडल्यानंतर आता पायी मोर्चा घेऊन राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, इतर शेतकरी संघटनांचे नेते व मंत्री हे देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत.
काँग्रेस नेते व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी देखील या सभेवेळी भाषण करताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘शेतकरी व मजूर जी मागणी करतात ती मंजूर होत नाही. मग हे कायदे का लादले जात आहेत. जो किसान की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ असा इशारा देखील सुनील केदार यांनी यावेळी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शहा, तर हमारे दो म्हणजे अंबानी आणि अदानी’
- कृषी कायदे रद्द होणार नाहीत; गिरीश बापटांचा पुनरुच्चार
- रिक्षाचालकांचा विमा काढण्यासाठी माजी खासदार पुत्राने घेतला पुढाकार !
- गिरीश बापटांच्या फालतू बडबडीने फरक पडत नाही; अजित नवलेंचं प्रत्युत्तर
- चेहरा तजेलदार आणि टवटवीत हवा; तर करा ‘हा’ घरगुती उपाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
