🕒 1 min read
मुंबई : राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांतील पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली.
पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार म्हणाले, बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत १३० लाख रुपये मंजूर केले आहेत. यात प्रामुख्याने आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, आठ आठवड्यावरील अंडी देणारे पक्षी रु. ९०/- प्रति पक्षी, सहा आठवडे वयापर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी रु. २०/- प्रति पक्षी, सहा आठवड्यावरील मांसल कुक्कुट पक्षी रु ७०/- प्रति पक्षी, कुक्कुट पक्षांची अंडी रु. ३/- प्रति अंडे, कुक्कुट पक्षी खाद्य रु. १२/- प्रति किलोग्रॅम, सहा आठवडे वयापर्यंतचे बदक रू. ३५/- प्रति पक्षी आणि सहा आठवड्यावरील बदक रु. १३५/- प्रति पक्षी , अशा प्रकारे बाधित क्षेत्राच्या १ किमी परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा केली जाणार असल्याचे केदार यांनी सांगितले.
दुसरीकडे बर्ड फ्लू संबंधी वेगळा फार्स निर्माण झाला तो थांबवला पाहिजे. देशात बर्ड फ्लूमुळे आजवर एकाही माणसाचा मृत्यू झालेला नाही. बर्ड फ्लूने एकाही माणसाचा मृत्यू झाला असेल तर तो शोधून द्या. त्याला मी रोख रक्कम बक्षिस म्हणून देईन, असं सुनील केदार यांनी म्हटलंय. सध्या राज्यात बर्ड फ्लूमुळे अनेक कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर मोठा परिणाम होत आहे. अशावेळी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सुनील केदार यांनी बर्ड फ्लूसंबंधी निर्माण झालेला फार्स थांबवला पाहिजे असं म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवड शहरात नागरिक,प्रवासी यांना रिक्षा चालकनी मीटरने प्रवास सेवा द्यावी: कृष्णप्रकाश
- ”त्या’ कुटुंबाची जबाबदारी ‘सिरम’ने घेतली आहे, आवश्यकता असेल तर शासन देखील निश्चित मदत करेल’
- सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीनंतर संयुक्त राष्ट्र महासचिवांकडून दुःख व्यक्त
- कॉंग्रेसने राज्यभर आंदोलन करण्यापेक्षा गृहमंत्र्यांना सांगून अर्नब गोस्वामीला अटक करावे – वंचित
- राष्ट्रद्रोह करणाऱ्या अर्नब गोस्वामीला तात्काळ अटक करा- कॉंग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
