🕒 1 min read
मुंबई – आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल याचे चित्र आकडेवारी आल्यानंतर स्पष्ट होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
काल राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुका पक्षचिन्हावर होत नसल्या तरी महाविकास आघाडी सरकारच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कामांवर जनता समाधानी आहे हे चित्र स्पष्ट झाले आहे.राज्यात महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्के देत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे असं तपासे म्हणाले,.
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या आणि यामध्ये आघाडी सरकारच्या कामावर जनतेने समाधान व्यक्त करत विजयाचा कौल दिला आहे. त्याचबरोबर यामध्ये राष्ट्रवादीला एक नंबरचा पक्ष म्हणून पुढे आणले आहे असा दावाही महेश तपासे यांनी केला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निर्णय क्षमतेवर जनतेचा विश्वास असल्यानेच हा कौल मिळाला आहे असा दावा देखील ते करायला विसरले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
- नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे नंतर महाराष्ट्र; मुश्रीफांचा पाटलांना टोला
- असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !
- ‘८० टक्के ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडी विजयी; खोटे आकडे देऊन जनतेची दिशाभूल भाजपने करू नये’
- ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा महत्वपूर्ण निर्णय
- “गाव कारभाऱ्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा; जय-पराजय विसरुन ग्रामविकासासाठी एकत्र या!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
