🕒 1 min read
मुंबई:- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. 34 जिल्ह्यांमधील जवळपास 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते. याचा काल (18 जानेवारी) निकाल लागला आहे.
आतापर्यंत शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेने राज्याच्या ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीनं ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहे. मात्र, ग्रामीण भागातील शिवसेनेची वाढलेली ताकद काँग्रेस राष्ट्रवादीची चिंता वाढवणारी ठरु शकते.
उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना ग्रामपंचायत निवडणुका ताकदीनं लढण्याचं आवाहन केले होते. शिवेसेनेचे मंत्री आणि आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात ताकद लावल्यानं शिवसेनेनं 2 हजारांहून अधिक ग्रामपंचायंतीवर सत्ता मिळवली आहे. शिवसेनेने आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 2217 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. राज्यातील 34 पैकी 19 जिल्ह्यांमध्ये शिवेसना पहिल्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात घाटणे येथील 21 वर्षाचा तरुणही विजयी झालाय. यासह तो सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य ठरलाय. ऋतुराज रवींद्र देशमुख असं या तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे त्याच्या पॅनललाही मोठा विजय मिळालाय. आता सरपंचपदाचं आरक्षण सोडतीनंतर त्याला संधी मिळाली, तर तो सर्वात तरुण सरपंच होण्याचीही शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे नंतर महाराष्ट्र; मुश्रीफांचा पाटलांना टोला
- असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !
- राज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण
- ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा महत्वपूर्ण निर्णय
- “गाव कारभाऱ्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा; जय-पराजय विसरुन ग्रामविकासासाठी एकत्र या!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
