🕒 1 min read
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
मात्र, भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
आता धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. कालपासून त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत. आता हे वृत्तसमोर येताच राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे. तर, कालच धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील हे उपस्थित आहेत.यासंदर्भात एबीपी माझाने माहिती दिली आहे.
आता सुरु झालेल्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल पटेल उपस्थित आहेत. आता पवार आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेतात, यावर मुंडेंचे राजकारण भवितव्य अवलंबून असल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप : अतुल भातखळकर यांचा पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा
- पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष लसीकरणासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण
- हनुमा विहारीचे भाजप खासदाराला सणसणीत प्रत्युत्तर
- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिक-यांची मेगा कार्यकारिणी जाहीर
- ‘देशात शेतकऱ्यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप भांडवलदारांच्या फायद्याचे कायदे करत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
