🕒 1 min read
नवी दिल्लीः सुरुवातीला एकत्र स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपन्या शाओमी रेडमी यांनी आता विभक्त होत स्वतंत्र ब्रँड बनले आहेत. त्यांनतर रेडमीने आपला फ्लॅगशीप फोन रिलीज केले आहे. यामध्ये पहिला फ्लॅगशीप मॉडल Redmi K20 Pro (Mi 9T Pro) होता. यानंतर कंपनीने Redmi K30 Pro लाँच केला होता. याला ग्लोबल मार्केटमध्ये Poco F2 Pro नावाने उपलब्ध करण्यात आले होते. आता स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा पहिला स्मार्टफोन Xiaomi Mi 11 लाँच केल्यानंतर कंपनीने याला चिपसेट सोबत Redmi K40 लाँच करण्याची घोषणा केली आहे.
ब्रँडचे एग्जिक्युटीव्हच्या माहितीनुसार, रेडमी के ४० सीरीजला फेब्रुवारी महिन्यात अधिकृतपणे लाँच करण्यात येणार आहे. टीजरमध्ये सीरीजचा उल्लेख आहे. त्यामुळे कंपनी रेडमी के ४० आणि रेडमी के ४० प्रो लाँच करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कंपनीकडून रेडमी के ३० चे अनेक व्हेरियंट्स लाँच केले होते. यात रेडमी के ३० प्रो झूम एडिशनचा समावेश होता.
यात वेगवेगळा कॅमेरा सेटअप दिला होता. या सीरीजमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा उल्लेख करण्यात आला होता. केवळ प्रो व्हेरियंटमध्ये हे चिपसेट देण्याची शक्यता होती. जनरल मॅनेजर यांच्या माहितीनुसार, याची किंमत २९९९ चिनी युआन म्हणजेच ३४ हजार रुपये असणार आहे. रेडमी के ४० प्रो स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा सर्वात स्वस्त हँडसेट होऊ शकतो.
याशिवाय, ब्रँडचे एग्जिक्युटीव्ह यांनी हेही सांगितले की, डिव्हाइसमध्ये सर्वात महाग फ्लॅट डिस्प्ले असणार आहे. याशिवाय 4000mAh बॅटरी दिली जाणार आहे. महाग डिस्प्लेचा अर्थ अमोलेड डिस्प्ले असतो. त्यामुळे प्रो व्हेरियंट या डिस्प्ले सोबत येवू शकतो. रेडमी के ४० सीरीजच्या सर्व हँडसेट्स १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेट एलसीडी पॅनल सोबत येतील.
महत्वाच्या बातम्या
- मेहबूब शेख यांच्याविरोधात कारवाई होत नसल्याने भाजप युवा मोर्चाने पुण्यात केली पोस्टरबाजी!
- बर्ड फ्लूसंदर्भात प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – मुख्यमंत्री
- आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे राज्य सरकार विरोधात आंबेडकरी जनतेत तीव्र नाराजी
- रवींद्र जडेजावर यशस्वी शस्त्रक्रिया पार; लवकरच करणार भारतीय संघात पुनरागमन
- ‘सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
