🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त 55 ओव्हर्सचा खेळ झाला. पावसाच्या अडथळ्यानंतरही ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवशी चांगली बॅटिंग केली. पहिल्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनला भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतच्या खराब कामगिरीचीही मदत झाली. पंतनं पहिल्या दिवशी विल पुकोव्हस्कीला दोनदा जीवदान दिलं.
ऋषभ पंतवर या खराब विकेट किपिंगबद्दल चाहत्यांनी आणि एक्स्पर्ट्स या दोघांनीही टीका केली. सोशल मीडियावरही पंतला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. या सर्वानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनही पंतच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या वेबसाईटची बोलताना पॉन्टिंग म्हणाला की, “पंतनं पदार्पण केल्यापासून इतर कोणत्याही विकेट कीपरपेक्षा जास्त कॅच सोडले आहेत. पहिल्या दिवशी त्यानं जे दोन कॅच सोडले ते पकडायला हवे होते. पुकोव्हस्कीनं मोठं शतक लगावलं नाही, हे पंतचं नशिब आहे. पंतला त्याच्या विकेट किपिंगवर जास्त कष्ट घेणं आवश्यक आहे.
Pant gives Puc a life! #AUSvIND pic.twitter.com/PwhpHuJI4D
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021
A rollercoaster of emotions for Will Pucovski! Initially given out, but on closer inspection he's recalled to the crease! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/WgT5lCRjAE
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे – रामदास आठवले
- ‘या’ योजनेसाठी ४० कोटींचा निधी वितरित;अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना होणार लाभ
- कंगना आज तरी कोर्टाचा मान राखणार का ?
- राज्यात कोरोना लसींच्या ड्राय रनचा आज दुसरा टप्पा
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
