🕒 1 min read
कोलकाता: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर सौरव गांगुलीची करोना चाचणीही करण्यात आली. त्या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे समजते.
या दरम्यान सौरव गांगुली ब्रांन्डींग करत असलेल्या अडानी ग्रुपच्या कंपनी फॉर्च्यून राइस ब्रान कुकिंग ऑयलच्या जाहिराती बंद करण्यात आल्या होत्या. कारण गांगुलीची प्रकृती बिघडल्यानंतर सोशल मीडियावर हृदयाची काळजी घेणार असलेल्या या तेलाच्या जाहिरातीला ट्रोल करण्यात आले होते.
मात्र यावर कंपनीने स्पष्टीकरण दिल आहे की, अडानी समूहाची कंपनी अडानी विल्मर यांनी सांगितलं की, तात्पुरते गांगुली यांना या जाहिरातीतून काढण्यात आले असून जाहिरात सुरु रहाणार आहे. डिप्टी चीफ एग्जीक्यूटिव अंगशू मलिक यांनी सांगितलं की, आम्ही सौरव गांगुली यांच्या सोबत काम करत राहू या जाहिरातीतून त्यांना तात्पुरत काढण्यात आल आहे. तर यावेळी आरोग्यदायी तेलाबद्दल त्यांनी सांगितले की, ‘राइस ब्रान ऑयल हे औषध नाही ते केवळ कुकिंग ऑयल आहे. ह्रदयविकार होण्याला इतर अनेक कारण असतात.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर भाजपा नेत्यांकडून होणारे राजकारण दुर्दैवी : सावंत
- जालना ते खामगाव रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण
- औरंगाबाद नामांतर : रेशीमबागेत गोळवलकर यांच्या पुस्तकाचा निषेध कधी करणार; खरातांचा सवाल
- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं रखडलेलं काम लवकरच पूर्ण होणार : गडकरी
- पुणे जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तु,किल्ले, स्मारके, संग्रहालये खुली करण्यास मान्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
