🕒 1 min read
जालना : जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला काल जालना रेल्वे स्थानकापासून सुरुवात झाली. 162 किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग जालना आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांमधून जाणार आहे.
मुळात इंग्रजांच्या काळापासून हा मार्ग प्रस्तावित आहे. तेव्हा काही ठिकाणी कामही सुरू झालं होतं पण ते नंतर बंद पडलं. त्यानंतर 2012 मध्ये पुन्हा सर्वेक्षण झालं पण हा मार्ग व्यवहार्य नाही असा अहवाल तेव्हाच्या सर्वेक्षण पथकानं दिल्यामुळं प्रस्ताव पुन्हा बासनात गुंडाळला गेला. आता नव्यानं सर्वेक्षण होत आहे. त्याचा अहवाल तीन महिन्यांत रेल्वे मंडळाला सादर केला जाईल.
दरम्यान, जालना ते बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव या रेल्वे मार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी मुंबईस्थित मध्य रेल्वे कन्स्ट्रक्शन विभागाचे एक पथक ४ ते ८ जानेवारीदरम्यान विविध गावे, बाजार समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या मार्गावरील वाहतुकीसंदर्भातील सद्य:स्थिती जाणून घेणारा अहवाल ते रेल्वेला सादर करणार आहेत.जवळपास 80-90 वर्ष कागदावर असलेला हा रेल्वेमार्ग जमिनीवर येतो का ते त्यानंतरच कळेल.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर भाजपा नेत्यांकडून होणारे राजकारण दुर्दैवी : सावंत
- महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा धुव्वा उडवत भाजपाच्या मनिषा धावडे झाल्या नागपूरच्या उपमहापौर
- औरंगाबाद नामांतर : रेशीमबागेत गोळवलकर यांच्या पुस्तकाचा निषेध कधी करणार; खरातांचा सवाल
- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं रखडलेलं काम लवकरच पूर्ण होणार : गडकरी
- पुणे जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तु,किल्ले, स्मारके, संग्रहालये खुली करण्यास मान्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
