Share

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं रखडलेलं काम लवकरच पूर्ण होणार : गडकरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कोकणातील जनतेसाठी फार महत्वाचा आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून या मार्गांचे काम अंत्यत संस्थ गतीने सुरू होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अडचणी येत होत्या मात्र, आता या त्रासातून लवकरच सुटका होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं रखडलेलं काम पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असल्याचं माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी काल रत्नागिरीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या आरवली ते वाकेड मार्गाचं केवळ दहा टक्के चौपदरीकरण झालं आहे. इतर ठिकाणची कामं प्रगतिपथावर आहेत. ती सर्व कामं २०२२ च्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील, असं गडकरी यांनी सांगितल्याचं ते म्हणाले.

ऑनलाइन मार्केटिंग, कर्जाच्या व्याजदरातली कपात, साडेतीन पटींनी वाढवलेली पीककर्जमर्यादा, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताचं मातीपरीक्षण, थेट बँकेत जमा होणारं अनुदान अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक बाबी केंद्र सरकारनं अमलात आणल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सध्या सुरू असलं, तरी त्यावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशाही प्रभू यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!