Share

औरंगाबाद नामांतर : रेशीमबागेत गोळवलकर यांच्या पुस्तकाचा निषेध कधी करणार; खरातांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

औरंगाबादच्या नामांतरावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील नामांतराला विरोध केला आहे. त्यामुळे, संभाजीनगर व्हावे अशी मागणी करणाऱ्या व राज्यासह औरंगाबाद महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची मात्र मोठी कोंडी झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या शहराच्या नामांतरावरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे.

दरम्यान, आता या वादात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)ने देखील उडी घेतली आहे. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रात औरंगाबाद नामांतराचे चर्चा आहे पण भाजप राजकारण करत आहे. चंद्रकांत पाटील जी संभाजीनगर हा आमचा अस्मितेचा विषय आहे असे खोटे बोलत आहे.खरंच तुम्हाला संभाजीराजे यांच्याविषयी आदर असेल तर तुमचे महान गुरु गोळवलकर यांनी संभाजी महाराजांबद्दल जो उल्लेख केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे त्यामुळे आपण मुंबई हुतात्मा चौकात किंवा नागपूरच्या रेशीमबागेत गोळवलकर यांच्या पुस्तकाचा निषेध कधी करणार हे जाहीर करावे असे आव्हान त्यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!