Share

‘नो मराठी, नो एमेझॉन’; मराठी वापरासाठी मनसेचा आक्रमक पवित्रा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी भाषिक अस्मिता जपण्याचा आग्रह धरणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुमारे २ महिन्यांपूर्वी ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांना त्यांच्या ॲपमध्ये मराठी भाषा वापरण्याचा इशारा दिला होता. यावेळी मनसेने एमेझॉन ला काही दिवसांचा अवधी देखील दिला होता. मात्र, मुजोर एमेझॉन व्यवस्थापनाने अजूनही मराठी भाषेच्या वापराबाबत कोणतेही पाऊल उचललेलं नाही.

यामुळे आता मनसे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आली आहे. एमेझॉनविरोधात ‘नो मराठी, नो एमेझॉन’ असा मजकूर मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील एमेझॉनच्याच जाहिरातींवर लिहिला आहे. तर, मुंबईतील माहीम, अंधेरी, बीकेसी, वांद्रे आणि इतर भागातही अशा पद्धतीने निषेध  फलक लावण्यात आलेले पाहायला मिळत आहेत.

‘तुम्हाला महाराष्ट्रात आमची मराठी भाषा मान्य नाही, आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही’ असा मजकूर देखील या फलकांवर लिहिलेला आहे. खरं तर अनेकदा ग्राहकांना आपल्या ऑफर्सने आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करून एमेझॉन सारख्या कंपन्या मराठीतही जाहिरात करतात. मग त्यांच्या दैनंदिन वापरामध्ये मराठी का नाही? याचा विचार आपण नक्कीच करायला हवा. एमेझॉनमध्ये दक्षिणेकडच्या भाषा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पण मराठीच्या मागणीला कानाडोळा का? असा सवाल मात्र कायम आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!