🕒 1 min read
नवी दिल्ली : राज्यसह देशातील अनेक ठिकाणी महामार्गांची दुरावस्था असतानाही प्रवासासाठी टोल द्यावा लागतो. अनेकदा टोलवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसतात या समस्येवर खाजगी व सरकारशी निगडित टोलनाका चालक कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाने देखील झापलं होत. तर, मागील वर्षी फास्ट टॅगची संकल्पना अंमलात आणत ही समस्या कमी करण्यासाठी पाऊल उचलण्यात आलं होतं.
मात्र आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतुकीच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. पुढच्या दोन वर्षांमध्ये भारताला टोल नाक्यांपासून मुक्ती देणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. देशातील रस्ते वाहतुकीमध्ये नितीन गडकरींच्या काळात अनेक भरीव कामे केली गेली आहेत.
केंद्र सरकार रशियाच्या मदतीने Global Positioning System (GPS) टेक्नोलॉजीचा वापर केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं टोल उत्पन्न 5 वर्षांमध्ये 1.34 ट्रिलियनपर्यंत वाढणार आहे. यासंदर्भात संबंधित विभागांची नुकतीच एक बैठक झाली असून त्यात सादरीकरण करण्यात आलं आहे. या नव्या रचनेमुळे 1,34,000 कोटींचं उत्पन्न वाढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
टोल नाक्यांच्या व्यवहारात प्रचंड गैर व्यवहार होत असल्याच्या तक्रारीही कायम होत असतात. मात्र, फास्ट टॅगमुळे गैरव्यवहारास चाप बसला असून येत्या काळात टोल नाकेच बंद होण्याचे संकेत गडकरींनी दिले आहेत. तसे झाल्यास नागरिकांना उत्तम व्यवस्था व चांगली सोय मिळण्यास मदत होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ खास कारणासाठी डिसले गुरुजी ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर दिसणार
- …तर जानेवारीमध्येच महाराष्ट्रात कोरोना लसीकरण सुरु करू : आरोग्यमंत्री राजेश टोपे
- अजित पवारांमध्ये जर एवढी ताकद असती तर ‘तेव्हा’ त्यांना आमदार टिकवता आले असते : पाटील
- महाविकास आघाडीत तणाव वाढणार? काँग्रेस नेत्याने दिला स्वबळावर लढण्याचा नारा
- केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत कृषी कायद्यांच्या प्रतिचे केले तुकडे-तुकडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

