Share

वुहानचा व्हायरस त्याला भारी पडणार ‘पुनावाला सायरस’, पवारांच्या वर्गमित्राची सिरम !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेले आठ महिने देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोकांना या रोगाची लागण झाली तर लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या रोगावर ठोस औषध नसल्याने करण्यात आलेल्या ताळेबंदीमधून सावरत असतानाच दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे पुन्हा उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

अशातच एक सकारात्मक वृत्त समोर येत आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (SII) विकसित करण्यात येत असलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती खुद्द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली आहे. याच सिरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी भेट देणार आहेत. पण नक्की सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया काय आहे याचं कोड अनेकांना पडलेलं कोड आहे. चला तर जाणून घेयुयात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि त्याचे संस्थापक सायरस पूनावाला यांच्याबद्दल

काय आहे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ?

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधे निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम कंपनी म्हणून ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ला नावाजले जाते. व्यावसायिक सायरस पूनावाला यांनी १९६६ साली या कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे. शरद पवारांचे पुण्यातील बीएमसीसी कॉलेजमधील वर्गमित्र असलेल्या सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात 1966 साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सर्वप्रथम धनुर्वात बरा करणाऱ्या औषधाचा शोध लावला. धनुर्वातावर औषध निर्माण करणारी ही देशातील पहिली कंपनी ठरली. त्यानंतर १९७४ साली कंपनीने डीटीपी लस शोधली. या लसीकरणामुळे धनुर्वात, घटसर्प आणि खोकला बरा होतो. तसेच १९८१ साली सर्पदंश आणि १९८९ साली गोवरवरील लसीकरणाचा शोध या कंपनीने लावला. म्हणजेच बरा न होऊ शकणाऱ्या अनेक आजारांवर या कंपनीने औषधं शोधली आहेत. आता त्यांनी विकसित केलेल्या लसीने कोरोना बरा होणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे.

सध्याच्या घडीला सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही १.५ बिलियनहून अधिक औषधांची निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीतून १०० हून अधिक देशांना औषध पुरवले जाते. जगातील प्रत्येक दुसऱ्या लहान मुलाला ‘सिरम’ची लस दिली जाते इतका मोठा आवाका सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा आहे.

कोण आहेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक ?

सायरस पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आहेत. त्यांचा जन्म १९४१ साली झाला. हॉर्स रेसिंगची आवड असलेल्या एका पारशी कुटुंबात सायरस यांचा जन्म झाला. पुण्याच्या बिशप स्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुणे विद्यापीठातून १९६६ साली ते पदवीधर झाले. औषध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल २००५ साली भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला. त्याच वर्षी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते सायरस यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर २६ जून २०१९ साली ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून त्यांना विज्ञान शाखेतील डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.

सायरस यांची एकूण संपत्ती ७३ हजार कोटी इतकी आहे. त्यावेळी ते देशातील सातवे आणि जगातील १७०वे श्रीमंत व्यक्ती ठरले होते. सध्या त्यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचा कारभार त्यांचा मुलगा अदार पूनावाला हे पाहत आहेत.

सायरस यांचे वडील आणि भाऊ घोड्यांना शर्यतींसाठी तयार करत असत, त्यांनी हडपसर येथे देशातील पहिला स्टड फार्म सुरू केला. वयाच्या अठराव्या वर्षी सायरस यांनीही वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्यास सुरुवात केली. त्यांना आजही घोडे शर्यतीची प्रचंड आवड आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना पॅरीसमध्ये एक घोडा आवडला आणि त्यांनी त्यावर चक्क ७.५ कोटीची बोली लावली होती. ते विदेशातही घोड्यांच्या शर्यतींमध्ये भाग घेतात. त्यांचं स्टड फार्म जगप्रसिद्ध आहेच. मात्र खास घोडे शर्यतीसाठी त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी घेऊन खास कंपनी स्थापन केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!