मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे यांच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. परभणीत आयोजित भाजपच्या बुथप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होत.
दरम्यान, जे लोक सारखं सरकार पडणार म्हणतात ते ऐकताना मला गंमत वाटते. जी भांडी मोकळी असतात ती फार वाजतात. भरलेलं भांडं कधी आवाज करत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेले नाही. आज आम्ही आहोत कधी तरी त्यांचे येईल, पण ते लवकर येणार नाहीत. लोपं सारखं म्हणतात की हे सरकार पडणार. हे ऐकताना मला गंमत वाटते. मोकळी भांडी फार वाजतात. त्यामुळे त्यांनी करायचा तितका आवाज करावा, सरकार पडलं तर बघू काय करायच ते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपकडून सुरू असलेल्या अपप्रचाराचा चांगलाच समाचार घेतला. तर दुसऱ्या बाजूला देशाचे प्रधानमंत्री आपले कौतुक करायला येणार असतील, मी त्यांच्या दौऱ्याचा चांगला अर्थ काढतेअसे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होतंय हे बघण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल ? असेही त्या पुढे म्हणाल्या.झी २४ तासने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियाच्या धावांचा डोंगर; पांड्याची लढवय्यी झुंज
- ‘चंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठी झाला आहे’
- वीजबिलाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद? थोरातांनी केली नितीन राऊत यांची पाठराखण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यासह हैदराबाद आणि अहमदाबाद दौऱ्यावर
- राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

