Share

शिर्डी नगरपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी कटिबद्ध व्हा- राधाकृष्ण विखेंचे कार्यकर्त्यांना आदेश!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. अनेक महीने घरात बसलेले मुख्यमंत्री राज्याने कधी पाहीले नव्हते. शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. समाजातील कोणत्याच घटकांना आघाडी सरकार दिलासा देवू शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास मंत्राने संपूर्ण देशाचा विश्वास संपादन केला आहे.

बिहार निवडणुकीच्या यशानंतर सर्वाची जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेवून आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत पोहचवा. राज्यात लवकरच सत्ता येईल. शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी कटीबध्द व्हा, असा संदेश माजी मंत्री तथा भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.

शिर्डी शहरातील भाजपच्या नूतन पदाधिकार्‍यांना नियक्ती पत्र आ.विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ.विखे पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचे अपयश जनतेला सांगावे लागेल.

आगामी काळात शिर्डी नगरपंचायतीची असलेली निवडणुक लक्षात घेवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजन सुरू करावे. थोड्याच दिवसात राज्यात भाजपची सत्ता येईल आणि शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपा झेंडा फडकेल असे सुतोवाचही आ.विखे यांनी केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे आहे. इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतून जनतेचे पाठबळ भाजपाच्या पाठीशी असल्याचे सिध्द झाले आहे, असे आ.विखे म्हणाले.

यावेळी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, पक्षाच्या उद्योग आघाडीच्या उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख शिवाजीराव गोंदकर, शहराचे अध्यक्ष सचिन शिंदे, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांच्यासह आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!