बीड : २०१९ विधानसभा निवडणुकांवेळी माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर, त्या राज्यातील भाजपशी नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही काळ त्यांना राजकारणातून वनवास देखील घ्यावा लागला होता.
मात्र, पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करत भाजपने त्यांना राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त केलं. यानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचं दिसून आलं. भाजपवर अनेक वर्षांपासून नाराज असलेले ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला दणका देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर, शेकडो कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी देखील भाजपला सोडचिट्ठी देत एकनाथ खडसेंची वाट धरली.
मराठवाड्यात खडसे भाजपला आणखी काही धक्के देणार अशी शक्यता असल्याने मराठवाड्यात जम बसवण्यास नेत्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न आता भाजपकडून सुरु असल्याचं दिसून येत आहे. मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चमकदार कामगिरी केल्यानंतर भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. दरम्यान, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडं घालण्यास देखील तयार असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदाराने केलं होतं.
महत्वाच्या बातम्या –
- यंदाच्या दिवाळीत देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी एक दिवा लावा; पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
- …अन आईच्या आठवणीने शरद पवार गहिवरले !
- रिपब्लिक टीव्हीचा भाजपशी थेट संबंध असल्याने फडणविसांनी अन्वय नाईक प्रकरण दडपले !
- ‘पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा’; भाजपाची मागणी
- व्यर्थ न जाओ बलिदान : अवघ्या वीसाव्या भारत मातेसाठी जीवन केले अर्पण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
