🕒 1 min read
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दीपावलीचा उत्सव देशाच्या सैनिकांसोबत साजरा करणार आहेत. 2014 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीरमधील भारतीय सैनिकांच्या तळावर जाऊन दिवाळी साजरी करत आहेत. यंदाच्या वर्षी देखील ते दिवाळी सनिकांसोबतच साजरी करणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण देशातील जनतेला एक दिवा सैनिकांच्या नावे प्रज्वलित करण्याचं आवाहन केलं. त्यांनी ट्वीट करुन सांगितलं की “या दीपावलीला ‘सल्यूट टू सोल्जर’ म्हणून एक दिवा लावूया. सैनिकांच्या अद्भूत साहसाप्रती आपल्या मनातील भावना शब्दात व्यक्त केली जाऊ शकत नाह. सीमेवर तैनात जवानांच्या कुटुंबीयांचेही आम्ही आभारी आहोत,” असं मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
This Diwali, let us also light a Diya as a #Salute2Soldiers who fearlessly protect our nation. Words can’t do justice to the sense of gratitude we have for our soldiers for their exemplary courage. We are also grateful to the families of those on the borders. pic.twitter.com/UAKqPLvKR8
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2020
दरम्यान, दिवाळी उत्साहाने पण योग्य खबरदारी घेऊन साजरा होईल अशी भावना प्रत्येक नागरिक करत असतानाच पाकिस्तानने पुन्हा आपले नापाक इरादे पूर्ण करण्यासाठी कुरापती सुरु केल्या आहेत. भारतात कोणताही सण आला की काही ना काही ग्रहण लावायच्या तयारीत शत्रू राष्ट्र असतात. त्यामुळेच त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य देखील सज्ज असतं.
पाकिस्तानने काल (दि. १३) रोजी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यात महाराष्ट्रातील २ वीरपुत्रांचा देखील समावेश आहे. पाक सैन्याकडून शुक्रवारी पहाटेपासूनच वारंवार शस्त्रीसंधीचं उल्लंघन केलं जात होतं.
महत्वाच्या बातम्या –
- बारामती नगरपालिकेवर फडकले काळे झेंडे; अजित पवारांनी बोलावली बैठक
- …अन आईच्या आठवणीने शरद पवार गहिवरले !
- रिपब्लिक टीव्हीचा भाजपशी थेट संबंध असल्याने फडणविसांनी अन्वय नाईक प्रकरण दडपले !
- ‘पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा’; भाजपाची मागणी
- व्यर्थ न जाओ बलिदान : अवघ्या वीसाव्या भारत मातेसाठी जीवन केले अर्पण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
