🕒 1 min read
मुंबई : वास्तुविषारद अन्वय नाईक यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काल, पहाटे पाच वाजता रायगड पोलिस मुंबई पोलिसांच्या टीमसह अर्णब गोस्वामी यांच्या वरळीतील घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना घरातच घुसू दिलं नाही. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी दीड तास पोलिसांसोबत हुज्जत घातली. यानंतर त्याला अटक करून अलिबागला नेण्यात आले.
अर्णबवरील कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप करत भाजपने राज्यभरात आंदोलन करून निषेध केला गेला. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र पोलिसांची पाठ थोपटत मराठी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठीच्या या कारवाईचे समर्थन केले.
भाजपने केलेल्या समर्थनावर शिवसेनेकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आज भाजपला लक्ष्य करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची आवई भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील लोकांनी उठवली आहे. त्यांच्या जोडीला दिल्ली सरकारमधील अनुभवी शहाणेही सामील व्हावेत हे आश्चर्यच आहे.
कधीकाळी ‘काँग्रेस’ गवत हे अगदी निरुपयोगी उत्पादन म्हटले जात असे. ते केवळ निरुपयोगीच नव्हे तर चांगलेच उपद्रवी असल्याचे मत तेव्हाच्या राजकीय विरोधकांकडून व्यक्त केले जात होते. त्याच गवताचा काढा करून सध्याचे भाजपवाले दिवसातून दोन वेळा पीत असावेत असे त्यांचे वर्तन आहे. मुंबईतील एका वृत्तवाहिनीचा मालक, संपादक असलेल्या अर्णब गोस्वामी यास एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली. त्याच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही.
आता चौकशीत काय ते सत्य बाहेर येईल. यात ‘आणीबाणी’ आली, काळा दिवस उजाडला, पत्रकारितेवर हल्ला झाला, असे काय आहे? अर्णब गोस्वामी व त्यांची वृत्तवाहिनी कोणत्या प्रकारची पत्रकारिता करते? व त्यांच्या बरळण्यामागे कोणाची फूस आहे हे जगजाहीर आहे. सोप्या भाषेत ज्यास सुपारी पत्रकारिता म्हणावे तोच प्रकार आहे.
गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर प्रमुख नेत्यांच्याबाबत गरळ ओकली म्हणून त्यास अटक झालेली नाही. त्याचा संबंध एका मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे व मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला वगैरे अजिबात नाही. गुजरातमध्ये सरकारविरोधी लिहिणाऱ्या संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही?
महत्वाच्या बातम्या
- एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा ! : शिवसेना
- बिहार निवडणुकीनंतर मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार ? मोठ्या फेरबदलाची चर्चा
- मराठी भय्ये नेते शिमगा असल्यासारखे का बोंबलत आहेत?
- महाराष्ट्रात नावलौकीक मिळविणारे निलेश लंके यांच्या रूपाने मला भाऊ मिळाला- सुप्रिया सुळे
- ‘अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक हा पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा प्रकार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
