Share

करवीरनिवासिनी अंबाबाई रुसलेल्या त्र्यंबोलीदेवीच्या भेटीला ; नक्की वाचा काय असतो हा सोहळा !

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सव पार पडत आहे. राज्यभरात यंदा कोरोनाच्या सावटामुळे सण, उत्सवांवर बंधन असल्यानं काहीसा उत्साह कमी असला तरी भाविक शक्य तसे मनोभावे हे उत्सव साजरे करत आहेत. या काळात आदिशक्तींची पूजा देशभरात केली जाते.

महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, वणी आणि माहूर या साडेतीनशक्तिपीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेत असतात. मात्र या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिरे उघडलेली नाहीत. या उत्सव काळात देवींचे सर्व धार्मिक विधी पार पडणार असल्याचे देवस्थान समितींमार्फत असून भाविकांना देवींचे दरवर्षीप्रमाणे दर्शन घेता येणार नाही. मंदिर व्यवस्थापनांनी भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करून दिली आहे.

नवरात्रोत्सवात करवीरनिवासिनी अंबाबाईची श्रीकरवीरमाहात्म्यातील अध्यायानुसार पूजा बांधली जाते. देवीचं नेत्रदीपक रूप भक्तगण डोळ्यात साठवण्यासाठी लगबग करत असतात. यंदा प्रत्यक्ष जाऊन जरी दर्शन घेता येत नसलं तरी आम्ही आपल्यासाठी रोज देवीच्या रूपाचं दर्शन घडवत आहोत.

पंचमीचा सोहळा !

आज नवरात्रीतील पाचवी माळ म्हणजेच पंचमी ! कोल्हापुरात हा दिवस खास असतो. कारण स्वतः करवीरनिवासिनी आपल्या रुसलेल्या मैत्रिणीला म्हणजेच त्र्यंबोलीला भेटायला जाते. वर्षानुवर्षे हा सोहळा साजरा केला जात आहे. यंदा देखील ही परंपरा अखंडित ठेवली गेली असून खास रथातून देवीची पालखी त्र्यंबोली मंदिरात दाखल झाली. यांनतर, दोन्ही देवींची भेट घडवून आणली गेली. कोल्हासुराचा वध त्र्यंबोली मातेला पाहता न आल्याने ती रुसल्याचे समजताच स्वतः अंबाबाई रुसवा दूर करण्यासाठी एका प्रात्यक्षिकाद्वारे ते दाखवते.

हीच प्रथा दार नवरात्रीला आजही पार पडते. आपल्या सर्व लवाजम्यासह करवीरनिवासिनी त्र्यंबोलीच्या भेटीला जाते. म्हणूनच देवीची आज गजारूढ रूपातील पूजा बांधली जाते. कोल्हासुराचा वध म्हणून एका बालिकेकडून कोहळा फोडला जातो.

पहा फोटो-

 

त्र्यंबोली देवी व अंबाबाई भेट –

कोहळारूपी कोल्हासूर राक्षस –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!